Headlines

‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात वैभववाडीत गणरायाचे विसर्जन…

वैभववाडी प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला त्या घोषणांनी परिसर दुमदुमत वैभववाडी तालुक्यातील 11 दिवसाच्या गणपतींचे मोठ्या भक्तिमय वातावरणात फटाकड्यांची आतंकवादी करत डीजेच्या तालावर ताशाच्या गजरात सुख नदीमध्ये रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले.
वैभववाडी तालुक्यातील 11 दिवसाच्या गणरायाचं वैभववाडी शहरातील तीन सार्वजनिक गणपतीचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले मृदंगाच्या ढोल ताशाच्या गजरात फटाकड्याची अत्यंत बाजी करत भक्तांनी आपल्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप दिला. वैभववाडी शहरातील गणेश नगर येथील सार्वजनिक गणपती गोपाळ नगर सार्वजनिक गणपती व तांबेवाडी येथील सार्वजनिक गणपतीचे वैभववाडी शहरात मोठी मिरवणूक काढून सुख नदीच्या मुख्य पात्रात रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले मिरवणुकीमध्ये गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी गणपती मिरवणुकीमध्ये कुठेही अनाचित प्रकार घडू नये म्हणून क** पोलीस बंदोबस्त शहरात तैनात केला होता.
अनंत चतुर्थीश सणानिमित्त गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिक गणेश भक्त विसर्जनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होत 11 दिवसाच्या गणरायाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
फोटो वैभववाडी गणेश नगर येथील सार्वजनिक गणपती मिरवणूक दिसत आहे
तर गोपाळ नगर गणपती मिरवणूक छाया संजय शेळके वैभववाडी.

You cannot copy content of this page