माजी आमदार शंकर कांबळी:स्थानिकांच्या समस्या, घरे, व अन्य अडचणी सोडविण्यास ताज मँनेजमेंट व मंत्री केसरकर तयार..
⚡वेंगुर्ले ता.२९-: शिरोडा वेळागर येथील २६ वर्षे रखडलेला प्रकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अथक प्रयत्नाने मार्गी लागून जमीन मालकांना न्याय मिळत असेल तर कोणीही इतर जमीन मालकांनी विरोध न करता सर्वानीच प्रकल्पास साथ देऊन प्रकल्पामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या फायद्यांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जमिन मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे नेतृत्व माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा-वेळागर भूमीपुत्र संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत केले.
दरम्यान, एका सोशल मिडीयाने शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज हॉटेल प्रकल्पाबाबत दिलेल्या वृत्तात शिरोडा वेळागर भूमीपुत्र संघाच्या (नोंदणीकृत) वतीने माजी आमदार शंकर कांबळी यांनी प्रकल्प स्थळाची प्रत्यक्ष भेटी वेळी पहाणी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर काय म्हणाले होते ती वस्तुस्थिती मांडली.
शिरोडा बाजारपेठ येथील माजी आमदार शंकर कांबळी यांच्या कार्यालयात शिरोडा वेळागर भूमीपुत्र संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार यांच्या अध्यक्षते खाली आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत वेळागर भुमीपुत्र संघाचे अध्यक्ष महादेव रेडकर, खजिनदार जगन्नाथ डोंगरे, सदस्य जनार्दन पडवळ, सदाशिव कांबळी, मंगेश डोंगरे विठ्ठल कांबळी, नंदकुमार कांबळी, शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे आदींचा समावेश होता.
यावेळी माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले दि. २४ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री व या विभागाचे आमदार दीपक केसरकर व आपण (माजी आमदार शंकर कांबळी) यांनी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन कांही बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी केली. कारण त्या शेतकऱ्यांचा जमीन मोजणीस आक्षेप होता. सदर पाहणी पूर्ण झाल्यावर मंत्री केसरकर यांनी शेतकऱ्यांना संबोधीत करताना शासनाची भूमिका स्पष्ट केली. कांही शेतकऱ्यांनी संपादीत जमिनीपैकी ९ हेक्टर जमीन संपादनातून वगळण्यासाठी निवेदन सादर केले होते. त्याबाबत श्री. केसरकर यांनी, सदर जमिनीचे संपादन झालेले असून जमीन शासनाच्या मालकीची आहे. त्यामुळे आता ती जमीन संपादनातून वगळण्याबाबत मी आपणास आश्वासन देऊ शकत नाही.
सदर प्रकल्पाचे बी-१ आणि बी-२ असे दोन झोन आहेत. पैकी बी-१ या झोनमधील जमिनीचे मोजमाप पूर्ण झालेले आहे. आणि बी-२ झोनमधील जमिनीचे मोजमाप पूर्ण झालेले नाही. संपूर्ण प्रकल्पाकरिता १०२.८७ एकर खाजगी जमीन व ३१:५४ एकर शासकीय जमीन संपादीत केलेली आहे. पैकी १०० एकर जमिनीचे मोजमाप पूर्ण झालेले आहे. या भागातील ९० टक्के शेतकऱ्यांचे प्रकल्पाला समर्थन असून लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सहकार्य करीत आहेत. काही १० टक्के शेतकरी प्रकल्पास विरोध दर्शवत आहेत. जे शेतकरी विरोध करीत आहेत. त्यांनी शासन संपादीत जमिनीमध्ये अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेले असून सदर अतिक्रमण वाचविण्यासाठी इतर शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.
तरी आमची शासनास विनंती आहे की, ज्या जमिनीचे मोजमाप पूर्ण झालेले आहे त्या जागेत प्रकल्पाचे काम तातडीने चालू करून शेतकऱ्यांना जमिनीच्या वाढीव मोबदल्याच्या पैशाचे वाटप करावे. अन्यथा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत कराव्यात. आमच्या मागणीनुसार ताजकडून शिरोडा वेळागर भुमीपुत्रांच्या जमीनीचा वाढीव मोबदला हा देण्यासाठी ६० कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. सदर रकमेतून या भागातील भुमीपुत्रांना एक एकर साठी सुमारे 60 लाख रुपये तर प्रती गुंठा सुमारे दिड लाख रूपये प्रमाणे वाढीव मोबदला देण्यात येणार आहे. जर वाढीव मोबदला. त्या भागातील घरे, घरांचे कोपरे, संडास, विहिरी व तत्सम गोष्टीची पुर्तता ताज मँनेंजमेंट मार्फत करून देण्याचा प्रयत्न मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून होत असल्याने सर्वांनीच ताज प्रकल्पासाठी साथ द्यावी. ताज प्रकल्प हा आंतर राष्ट्रीय स्तरावरील असल्याने त्या अनुषंगाने अनेक व्यवसाय या भागात होणारे आहेत. त्यातून रोजगार स्वयंरोजगारालाही चालना मिळेल. तसेच ताज मॅनेजमेंटनेही मुंबईतील बैठकित स्थानिक प्रत्येक भुमीपुत्रांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस स्कील डेव्हलपमेंट कोर्स देवून रोजगार देण्याचेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिरोडा वेळागरचा विकास हा स्थानिकांच्या सहकार्याने होत आहे.
गेल्या २६ वर्षापासून ताज ग्रुपचा प्रकल्पाबद्दल काही अडचणी माध्यमातून निर्माण झालेल्या होत्या त्यासाठी आतापर्यंत सर्वच पक्षाच्या नेतेमंडळी ना अर्ज विनंती या करून त्याचा काहीच परिणाम दिसून येत नव्हता. परंतु गेल्या काही दिवसात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष दिला आहे. स्थानिकांचे प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करीत होते आणि आहेत. त्या अनुषंगाने ताज ग्रुपच्या मुंबई येथे बैठक घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये संघटनेचा माध्यमातून मांडलेल्या समस्या कशा मार्गी लावता येतील याची पूर्ण माहिती शिरोडा वेळागर भुमीपुत्र यांनी त्या बैठकित मांडली. त्यानुसार दिपक केसरकर यांनी या भागातील जमीनदारांना वाढीव रेट मिळावा. याबाबतची भूमिका मांडली त्यास ताजग्रुपकडूनही संमती मिळाली. ६० कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले असून ताजग्रुपच्या मॅनेजमेंट कडून वाढीव दराने ते देऊ केलेले आहेत त्या माध्यमातून प्रति गुंठा सुमारे दीड लाख रुपये प्रमाणे ते संबंधित जमीनदारांना दिले जाणार आहेत. तसेच काही प्रकल्प होईल त्याच स्थानिक भमिपुत्रांनाच कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन नोकऱ्या नोकऱ्या देण्याचाही ताज मॅनेजमेंट शब्द दिलेला आहे. जे काही लोक ३० टक्केच जमीन मोजणीस विरोध करत आहेत. त्या व्यक्तींची व स्थानिक लोकांची आपण संपर्क संवाद साधला असता त्यांनी आपला या प्रकल्पास विरोध नाही. परंतु काही मुंबईतील लोकांच्या सांगण्यावरून आपणास विरोध करावा लागत असल्याचे शंकर कांबळी यांनी स्पष्ट केले.
