Headlines

रानभाजीत वर्षा धोंड तर वनौषधी ओळखमध्ये सावरेश्वर बचत गट प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३०-: आवेरे ग्रामस्थ आणि आवेरे-तेंडोली जिल्हा परिषद शाळा यांनी आयोजित केलेल्या रानभाजी पाककला आणि वनौषधी ओळख स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रानभाजी पाककृती स्पर्धेत वर्षा यशवंत धोंड यांनी सादर केलेल्या ‘भरलेली कंटोळी‘ या पाककृतीने तर, वनौषधी ओळख स्पर्धेत सावरेश्वर महिला बचत गट आवेरेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

Read More

कुडासे प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

दोडामार्ग l प्रतिनिधीकुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेजमध्ये मंगळवारी राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे सचिव,राष्ट्रीय कबड्डी पंच दिनेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यसपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.एस.परब ,ज्येष्ट शिक्षक एस.व्ही.देसाई,पी.बी.किल्लेदार,सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.बी.शेंडगे होतेश्री. चव्हाण म्हणाले,हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते….

Read More

तिलारी खोऱ्यातून हत्ती कुंभवडेत

हत्तींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांची वनमंत्र्यांसोबत बैठक ⚡दोडामार्ग ता.३०-:दोडामार्ग तालुक्यातील केर मोर्ले आणि शिरवल परिसरात शेती बागायतीचे नुकसान करणारे हत्ती अखेर सोमवारी रात्री कुंभवडेत पोचले.पहिल्यांदाच तेथे दाखल झालेल्या हत्तींनी शेतकऱ्यांचे माड,पोफळी आणि केळी बागांचे नुकसान केले.हत्तींनी अरुण लाडोजी गावडे,महादेव गावडे आणि पांडुरंग शंकर कांबळे यांच्या शेती बागयतीचे नुकसान केले.दरम्यान,हत्तींना तिलारी खोऱ्यातून कर्नाटकातील नैसर्गिक अधिवासात पाठवावे यासाठी हत्ती…

Read More

सावंतवाडी मोती तलावात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोती तलाव भोवती सावंतवाडीकरांनी गर्दी केली होती. यावेळी अर्पण करण्यात आलेल्या सुवर्ण नारळ सावंतवाडी राजघराण्याकडून देण्यात आला होता. यावेळी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले आणि सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते नारळाचे विद्यिवत पूजन करून नारळ तलावात अर्पण करण्यात आला .यावेळी…

Read More

राष्ट्रवादी महिला, युवती काँग्रेसकडून पोलीस बंधू, भगिणी यांच्यासाठी पार पडला रक्षाबंधन उपक्रम

⚡सावंतवाडी ता.३०-: देशबांधव विविध सण उत्सव साजरे करत असताना आपले पोलिस बंधू भगिनी आपल्या सुरक्षेसाठी मात्र अहोरात्र ‘ऑन ड्युटी’ असतात. देशबांधवांची रक्षा करून खऱ्या अर्थाने बंधुत्वाचे कर्तव्य आपले पोलिस बंधू भगिनी अथकपणे पार पाडत असतात. त्यांच्या या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण…

Read More

शिंदे शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या

⚡सावंतवाडी ता.३०-: रक्षाबंधन सणानिमित्त शिवसेना शिंदेगट सावंतवाडी शहर महिला आघाडी तर्फे सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधण्यात आल्या यावेळी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष सौ.निता कविटकर, शहर अध्यक्ष सौ.भारती मोरे,माजी नगरसेविका सौ.शुभांगी सुकी, सौ.सपना नाटेकर, सौ.शर्वरी धारगळकर, उपशहरप्रमुख सौ.गीता सुकी, सौ.निलिमा चलवाडी, शाखाप्रमुख सौ.भारती परब, सौ.पुजा नाईक, सौ.सिमा सोनटक्के, सौ…

Read More

आराध्य सिनेमा १ सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला..

निरज देसाई यांची माहीती ; सामाजिक कार्यकर्त्या रेनूताई गावसकर यांच्या हस्ते शुभारंभ सावंतवाडी ता.३०-: येथील झाराप झिरो पॉईंट येथे “आराध्य थेटर” हे एक सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच शुभारंभ सकाळी 11 वाजता सामाजिक कार्यकर्ते रेनूताई गावसकर यांच्या हस्ते होणार आहे याबाबतची माहिती बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष निरज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Read More

वेताळ बांबर्डेमध्ये २ सप्टेंबर रोजी “श्रावणमेळा”चे आयोजन

⚡कुडाळ ता.३०-: ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आयोजित खास महिलांसाठी “श्रावणमेळा २०२३”चे आयोजन येत्या शनिवार, २ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मांगल्य मंगल कार्यालय, वेताळ बांबर्डे येथे सकाळी ठीक १० वाजता आयोजित केला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण आणि कुडाळच्या पोलिस निरीक्षक…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती सदस्यपदी राजाराम धुरी यांची निवड

⚡सावंतवाडी ता.३०-:सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे यांची तर या समितीच्या सदस्यपदी राजाराम धुरी, हरिभाऊ भिसे, सौरभ पाटकर, अजिंक्य पताडे, शैलेश जामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या शिफारसीनुसार उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी गठीत…

Read More

भिरवंडेकर मराठा समाज अध्यक्षपदी यशवंत सावंत बिनविरोध

⚡कणकवली ता,३०-: सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या भिरवंडेकर मराठा समाज मुंबई मंडळाच्या अध्यक्षपदीभिरवंडे जाभुळभाटलेवाडी येथील यशवंत वामन सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरात भिरवंडेकर मराठा समाज, मुंबईची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी पुढील ५ वर्षासाठी २०२३ ते२०२८ कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांची बिनविरोध निवड झाली. मंडळाचे अध्यक्ष अजित…

Read More
You cannot copy content of this page