सिंधुदुर्ग दिव्यांग मालवण शहर संघटनेतर्फे १९ रोजी बैठक

⚡मालवण ता.१८-: सिंधुदुर्ग दिव्यांग मालवण शहर संघटनेतर्फे दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता दत्त मंदिर भरड मालवण येथे नगरपालिका दिव्यांग निधी करिता हयात दाखल्यासाठी व नवीन फॉर्म भरणाऱ्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, दिव्यांग असलेल्यांचे सिव्हिल सर्जन सर्टिफिकेट यांचे झेरॉक्स प्रत, दोन फोटो घेऊन येणे आवश्यक आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page