राज्य कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
⚡कणकवली ता.१७-:
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, खास.डॉ. श्रीकांत शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुका कक्षप्रमुख, कणकवली ६ महिन्या करिता निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०१+१०४) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे. निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे सदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे.
गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब-गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कक्ष प्रमुख संदेश सावंत (पटेल) – ९५७९८८१०३९, कणकवली विधानसभा कक्ष प्रमुख हरेश पाटील- ९३०९५७९३७६, कणकवली तालुका कक्ष प्रमुख निलेश मेस्त्री – ७४९८३५८२०३, कणकवली तालुका कक्ष प्रमुख मंगेश गुरव- ९४२२४३३७६०, देवगड तालुका प्रमुख अमोल लोके – ७५४४९०३६०० ,वैभववाडी तालुका कक्ष प्रमुख विश्वाम रावराणे -९४२२६७४२६७ ,मालवण तालुका कक्ष प्रमुख उल्हास तांडेल – ९४०५१२०२९५, कुडाळ तालुका कक्षप्रमुख अरविंद करलकर – ९८९०२२३२५४८२, मालवण तालुका कक्ष प्रमुख आशिष नाबर – ९३२५१०४६६३२, कणकवली उपतालुका कक्ष प्रमुख रविंद्र नवाळे ९४२२६३२६५९ , कणकवली उपतालुका कक्षप्रमुख प्रशांत वनस्कर- ८४४९२१९२१ , यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .
यावेळी शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख राम राऊत (ठाणे) , गौरव गुळवणे विस्तारक, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटिल, विधानसभा युवक प्रमुख निलेश मेस्त्री, कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, महिला तालुका प्रमुख प्रिया टेंबकर, उपतालुका प्रमूख सरिता राऊत, प्रशांत वणस्कर, अरविंद करलकर, ओम पालकर, आदि उपस्थित होते.
