वेशभूषा स्पर्धा,आकर्षक बक्षिसे, भव्य लकी ड्रॉ स्पर्धा अश्या विविध बक्षिसांची मांदियाळी…
⚡मालवण ता.१७-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याच्यावतीने यावर्षीही दि २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्यादिवशी मालवण बंदरजेटीवर भव्य खुल्या गरबाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धा,आकर्षक बक्षिसे तसेच यंदा विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉ स्पर्धा अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याच्यावतीने गेल्यावर्षी पासून भव्य गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते गेल्यावर्षी मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून यावर्षीही मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्यादिवशी मालवण बंदरजेटीवर भव्य खुल्या गरबाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात मालवणी समलोचनासाठी प्रसिद्ध असणारे श्री बादल चौधरी यांच्या खास मालवणी शैलीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन होणार आहे.तरी मालवणवासीयांनी गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी ही आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका तर्फे मालवण वासीयांना करण्यात येत असल्याची माहिती मनसेचे प्रितम गावडे यांनी दिली आहे
