वेताळ प्रतिष्ठानचे काम युवकांना दिशा देणारे…

अर्चना घारे:वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, छत्रपती मित्रमंडळ तुळस आणि सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेंगुर्ला प्रतिनिधी- सध्यस्थितीत युवक समाजात दिशाहिन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरूण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, व्यावसायीक प्रशिक्षणे असे समाजहिताचे उपक्रम राबवित आहेत. आजच्या युवा वर्गाला दिशा देणारे आदर्शवत काम वेताळ प्रतिष्ठान करत असून त्यांचे हे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अर्चना घारे यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

  वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, छत्रपती मित्रमंडळ तुळस आणि सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित केलेल्या सलग २३व्या रक्तदान शिबिरात ३६ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या अर्चना घारे, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई आणि सरपंच रश्मी परब यच्या हस्ते झाले. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष सगुण माळकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.एडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ, छत्रपती मित्रमंडळाचे अध्यक्ष अवधूत मराठे, लिस्टर ब्रिटो, प्रकाश परब, श्रीकृष्ण कोंडूस्कर आदी उपस्थित होते.

  सिधुदुर्गात बहुआयामी कार्यक्रम करणारी वेताळ प्रतिष्ठान ही अग्रणी संस्था आहे. आजपर्यंत त्यांनी सलग २३ रक्तदान शिबिरे यशस्वीरित्या पार पाडली आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे प्रसन्ना देसाई म्हणाले. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान आणि छत्रपती मंडळच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार किरण राऊळ यांनी मानले.
You cannot copy content of this page