Headlines

महोत्सवांमधून कलागुण जोपासा…

राजन तेली: सांस्कृतिक महोत्सवाला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡वेंगुर्ला ता.१८-: कलागुण जोपासण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाची नितांत गरज आहे. युवक-युवतींनी या महोत्सवांमधून आपले कलागुण जोपासावे असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी सिंधु युवा विशालोत्सव.. शोध नाविन्याचा या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

  सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भारताची लोक परंपरा‘ यावर समूह नृत्य स्पर्धा तर वेस्टर्न गीतावर जोडी नृत्य स्पर्धा आणि मिमिक्री स्पर्धा घेण्यात आल्या. तिन्ही स्पर्धांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवती मिळून सुमारे २८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटनप्रसंगी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, जयंत मोंडकर, शैलेश जामदार, दशावतार नटवर्य पपू नांदोसकर आदी उपस्थित होते.

  समुह नृत्यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय (सावंतवाडी), परी डान्स क्रिएशन (कुडाळ) व न्यू इंग्लिश स्कूल (उभादांडा) यांनी अनुक्रमे तीन तर गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यलय (वेतोरे) व बॅ.खर्डेकर महाविद्यालय (वेंगुर्ला) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. जोडीनृत्यामध्ये दिक्षा नाईक व संजना पवार - प्रथम, नंदिनी बिले व विद्या मादकाचे-द्वितीय, आरव आईर व तन्मय आईर-तृतीय, जयेश सोनुर्लेकर व दिशंम परब तसेच विधी नाईक व सानिया वराडकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. मिमिक्रीमध्ये प्रथम-राहूल विठ्ठल कदम, द्वितीय-सौरव प्रदिप माळवदे, तृतीय-विजय रामा फाले, उत्तेजनार्थ - शाम पांडुरंग निवलेकर व नाना हरिश्चंद्र कांबळी यांनी मिळविले. स्पर्धांचे परिक्षण महेंद्र मातोंडकर व बी.टी.खडपकर यांनी केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.   कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर आणि आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.
You cannot copy content of this page