डच वखारीच्या डागडुजीसाठी तीन कोटींचा निधी मंजूर…

डॉ.संजिव लिगवत:डागडुजीचे काम लवकरात लवकर करावे सुरू…

⚡वेंगुर्ला ता.१८-: डच वखार सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी एक महत्त्वाची वास्तू आहे. शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून डच वखार डागडुजी व दुरूस्तीसाठी पत्र व्यवहार करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी सुमारे ३ ककोटी रूपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. त्यामुळे डच वखारीच्या डागडुजीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे कार्यालय रत्नागिरी येथे पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम खेकडे यांच्याकडे जनसेवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत यनी केली आहे.

  यावेळी पुरातत्त्व खाता रत्नागिरी येथील तंत्रज्ञ रूची शेंडगे, कार्तिक दरेकर, करण बेतकर, प्रांजल कोकीतकर, वैभव शिदे, भक्ती गोसावी, माही तुळसकर व जनसेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पुरातन वास्तू डागडुजी संदर्भात जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी पाहणी करून लवकरात लवकर दुरूस्ती सुरू न केल्यास आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचे शासनाला ठणकावून सांगितले होते, असेही डॉ. लिगवत यांनी स्पष्ट केले.
You cannot copy content of this page