आ.नितेश राणे यांचा ठाकरे सेनेला सेनेला धक्का
⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील असलदे शिवाजीनगरमधील असंख्य मुस्लिम समाज बांधवांनी ठाकरे सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत पदाधिकाऱ्यांसोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश भव्य स्वरूपात झाला.
आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे भाजपची शाल घालून पक्षात स्वागत केले.
ठाकरे सेनेचे पदाधिकारी गवस कुतुबुद्दीन साटविलकर.यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील रमजान नावळेकर ,हुसेन नावळेकर, ईलाई साटविलकर, अब्दुल साटविलकर,हसन साटविलकर,मन्सूर बटवाले, मुनाफ बटवाले,आरिफ नावळेकर,मोबिन साटविलकर, शैजाद साटविलकर, फरिदा साटविलकर, जैनफ साटविलकर,सुहाना साटविलकर, झहीर साटविलकर, शइदा नावळेकर,रेश्मा नावळेकर, सारा नावळेकर, साजोदा नावळेकर, अमिना साटविलकर,इब्राहिम साटविलकर,सुलेमान साटविलकर, सुलेमान साटविलकर,वाशिम साटविलकर, साजिदा साटविलकर, आशाबी साटविलकर,यास्मिन साटविलकर, साबा साटविलकर, महराज साटविलकर, शाईल नावळेकर म. शरीफ नावळेकर, महमद आरीप नावळेकर, सहरा म. श.नावळेकर,साजिरा म.नावळेकर, सलीम या. बटवाले ,मासूम बटवाले, रमिजान स.बटवाले, मुनाफ स.बटवाले,मिनाज स. बटवाले अशा मुस्लिम समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, भाजप तालुका सरचिटणीस पंढरी वायगनकर,ज्येष्ठ पदाधिकारी रज्जाक बटवाले, असलदे माजी उपसरपंच संतोष परब,रघुनाथ लोके,नांदगाव सरपंच भाई मोरोजकर, भाजपा महिला तालुका अध्यक्ष हर्षदा वाळके, कमलेश पाटील,माजी सरपंच संजय पाटील, यासिर मास्के,नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर,आदी सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
