राजापुरी मार्गावरील दोन पुलांना नाबार्ड अंतर्गत मंजूरी…

निलेश राणें यांनी केली पाहणी; कित्येक वर्ष होत होती मागणी..

⚡ओरोस ता.१८-: कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी ओरोस प्रजिमा-३७ मार्गावरील अत्यंत महत्वाच्या दोन पुलांना नुकतीच नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. गेली कित्येक वर्षे या ठिकणी उंच पातळीच्या पुलांसाठीची मागणी होती पावसाळ्यात या ठिकाणी असलेल्या मोऱ्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक खोळंबा होत होता त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे व पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत हे उंच पातळीचे पूल मंजूर व्हावेत यासाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार प्रत्येकी १ कोटी ५० लक्ष किमतीचे हे पूल मंजूर झाले आहेत. आज भाजपा नेते निलेश राणे यांनी या पुलाच्या प्रस्तावित जागांची पहाणी करून स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष भाई सावंत, भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. विनायक राणे, पप्या तवटे, सुप्रिया वालावलकर, निखिल कांदळगावकर, मनोरंजन सावंत, श्री. राजन चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page