बघ्यांची होतेय गर्दी : गायसह वासरे सुखरूप
⚡बांदा ता.१८-: मडुरा परबवाडी येथील शेतकरी पशुपालक शांताराम नार्वेकर यांच्या गौरी गायने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. सावंतवाडी तालुक्यात एकाच वेळी दोन वासरांना जन्म देणारी ही दुर्मिळ व पहिलीच घटना असल्याचे जाणकार पशुपालकांनी सांगितले. दरम्यान मडुरा पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी रवी पेडणेकर यांनी गायसह वासरांची पाहणी करून वासरे व गाय सुखरूप असल्याचे सांगितले.
आठ दिवसांपूर्वी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गौरी गायने दोन गोंडस वासरांना जन्म दिला. सदर घटनेची बातमी वाऱ्यासारखी मडुरा पंचक्रोशीत पसरली आणि बघ्यांची गर्दी झाली. गौरी गाय जर्सी क्रॉस असून दिवसाला सात ते आठ लिटर दूध देण्याची क्षमता आहे. शांताराम नार्वेकर हे शेती व्यवसायासोबत पशुपालनही करतात. गौरीची दोन्ही वासरे एकाच रंगाची एक सारखेच दिसतात.
मडुरा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शांताराम नार्वेकर यांच्या गायला 70 टक्के जरशीची लस देण्यात आली होती आणि ती यशस्वी झाल्याचे कर्मचारी रवी पेडणेकर यांनी सांगितले. मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनीही वासरांची पाहणी केली.
