रोटरी क्लबचा नेशन बिल्डर ॷॅवार्ड मुख्याध्यापक वामन तर्फे यांना प्रदान
⚡कणकवली ता.०५-: रोटरी इंटरनॅशनल बहुउद्देशीय कार्यक्रमांतर्गत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आपल्या उद्यमशील, परिवर्तनशील, प्रयोगशील विचारांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या गुरुजनांना नेशन बिल्डर ॷॅवार्ड देऊन गौरवण्यात येते. त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व…
