सुप्रिया सुळे::नुसते गोड बोलून काही होत नाही. तुम्हाला एमआयडीसी आणणारा हवा की पीआरओ हवा
दोडामार्ग ता.२७-: स्थानिक आमदार १० वर्षे मंत्री असून आडाळी एमआयडीसीचा प्रश्न सोडू शकत नाही, ही दुर्दैवी गोष्ट असून नुसते गोड बोलून काम होत नाहीत असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लगावला.
दरम्यान तुम्हाला एमआयडीसी आणणारा पीआरओ पाहिजे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केला.तसेच आमच्या चिन्हावर देखील एक वेळ निवडून आले यात देखील आमची चूक असल्याचे देखील सौ.सुळे यावेळी म्हणाले. ते दोडामार्गात आयोजित राष्ट्रवादी मेळाव्यात बोलत होते.
