सुप्रिया सुळे: अर्चना घारे या राष्ट्रवादी युवती सेनेतीलच
⚡दोडामार्ग ता.२७-: कोकणाने कमळाला केव्हाच जवळ केला नाही. त्यामुळे कोकणात येऊन भाजपवर बोलणं चुकीचे असा टोला राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज येथे लगावला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वप्रथम युती सेना स्थापन केले. त्यातील अनेक अर्चनाताई या त्याच सेनेतील होय असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, मोदी आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणतात. पण काल महाराष्ट्रात आल्यावर काहीच बोलले नाहीत. जोवर पवार साहेबांवर बोलत नाही तोपर्यंत हेडलाईन्स होत नाही असा टोला देखील सुळे यांनी यावेळी लगावला. शिक्षणमंत्री येथीलच, तुम्हाला शाळा पाहिजे की दारूची दुकाने ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर अजित पवार हे शरद पवार यांचे नाही राहिले ना बाळासाहेबांचे ! मग एकनाथ शिंदे यांचे काय होणार ? त्यामुळे शिंदे यांनी देखील सावध राहावे असा टोला देखील त्यांनी यावेळी अजित पवार यांना लगावला.
तसेच सुळे पुढे बोलताना म्हणाले की
संघर्ष ठेवा, अभ्यास करून पास होण्यात जी मजा ती कॉपी करून नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी भाजपवर लगावला.
