क्ष. म. घाडीगांवकर सेवा समाज संस्थेची 29 ऑक्टोंबर रोजी सभा

⚡कणकवली ता.२७-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत छबिलदास हायस्कूल, वनमाळी हॉलसमोर, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे .

संस्थेचे अध्यक्ष घनःश्याम सहदेव गांवकर याच्या अध्यक्षतेखाली सदरहू सभा घेण्यात येणार आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहुन कामकाजात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे सचिव गजानन घाडीगांवकर तसेच प्रचार-प्रसार समिती प्रमुख विजय गांवकर यांनी केले आहे .

You cannot copy content of this page