टायगर इज बॅक…

निलेश राणे यांचे स्वागताचे बॅनर ठरलेत लक्षवेधी;दुपारी समर्थकांकडून होणार जंगी स्वागत..

कुडाळ ता.२७-: टायगर इज बॅकचे बॅनर मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर लागले आहेत. भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावले आहेत. दोन दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होते. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर निलेश राणे यांची मुंबईत बैठक पार पडली.

या बैठकीत निलेश राणे यांची समजूत काढण्यास भाजप ज्येष्ठांना यश आले. त्यानंतर आज निलेश राणे सिंधुदुर्गात येत असून त्यांचे जोरदार स्वागत केले जाईल.

You cannot copy content of this page