अर्चना घारे:जिल्हा पर्यटनदृष्टया संपन्न असला तरी पर्यटनाला वाव मिळत नाही…
दोडामार्ग
सुप्रियाताई सुळे यांचे काम आदर्शवत आहे. आज देशात बेरोजगारी आणि महागाई वाढली असून हे सरकार मात्र जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, आज सिंधुदुर्गात सुप्रियाताई आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी म्हटले.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी प्रश्न जैसे तेच असून येथील आरोग्य व्यवस्था सुद्धा कमकुवत आहे. हा जिल्हा पर्यटनदृष्टया संपन्न असला तरी येथे पर्यटनाला वाव मिळत नाही. येथील काजू पिकाला हमीभाव नाही. पण तो शेजारच्या गोवा राज्यात मिळतो. येणाऱ्या काळात आमचा पक्ष चांगले काम करेल, असा विश्वास अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.
