Headlines

कुडाळमधील ९ जि. प. शाळांतील १,२१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार

कुडाळ : शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमधील १ हजार २१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत कुडाळ कवील कट्टा, कुडाळ नंबर एक, कुडाळ कन्या शाळा, बाबा चांद उर्दू शाळा, कुडाळ कुंभारवाडा, पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी शाळा, कुडाळ एमआयडीसी शाळा, मज्जिद मोहल्ला उर्दू शाळा आणि कुडाळ सांगिरडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजप सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर, तालुका चिटणीस राजू गवंडे, महिला जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, नगरसेवक निलेश परब व उदय मांजरेकर, नगरसेविका सौ. अक्षता खटावकर, सौ. ज्योती जळवी, सौ. श्रेया गवंडे, सौ. आफ्रीन करोल, महिला शहर उपाध्यक्षा सौ. विशाखा कुलकर्णी व सौ. तेजस्विनी वैद्य, तसेच माजी नगरसेवक सचिन काळप, राजू बक्षी आणि राजेश पडते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पांडुरंग शेठ पडते शाळेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थी विहान कुणाल तेंडुलकर याने उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page