पर्यटनस्थळांची पाहणी; शहर विकासातील विविध प्रकल्पांची घेतली माहिती..
⚡सावंतवाडी ता.०९-: चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देत शहरातील विविध पर्यटनस्थळांची पाहणी केली. सावंतवाडी शहराचा पर्यटन विकास, सौंदर्यीकरण तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती आनंदने वगी, सभापती मोहिनी मडगावकर, सभापती दीपली भालेकर आणि सभापती प्रतीक बांदेकर यांनी चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकांना सावंतवाडी शहरातील विविध विकासकामे व प्रस्तावित प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.
सावंतवाडीतील पर्यटनस्थळे, शहराची वैशिष्ट्ये, पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी तसेच नगरपालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती घेत चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकांनी शहराची पाहणी केली. दोन्ही नगरपरिषदांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील परस्पर अनुभवांची देवाणघेवाण होण्यास तसेच शहर विकासाच्या विविध संकल्पना जाणून घेण्यास मदत झाली.
