Headlines

साहित्यिक बनण्यासाठी लेखन, वाचनाची आवड महत्वाची…

राजेंद्र गोसावी:नगरवाचनालयात साहित्य परिचय कार्यक्रम.. कणकवली 2 डिसेंबर (प्रतिनिधी)-साहित्यिक बनण्यासाठी लेखन व वाचनाची आवड फार महत्वाची असते. साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे नवोदित साहित्यिकांनी वाचन केले पाहिजे. त्यामुळे तुमच्या लिखाणात व विचारांमध्ये प्रगल्भता येईल, असे प्रतिपादन कवी राजेंद्र गोसावी यांनी केले. कणकवली येथील नगरवाचनालयातर्फे वाचनालयात सभागृहात साहित्य परिचय कार्यक्रम आयोजित केला. याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गोसावी बोलत होते….

Read More

उघड्यावरील पाईपलाईन भूमिगत करावी…

ग्रामस्थांची मागणी: पाणी पुरवठ्यात खंड पडण्याची व्यक्त केली भीती.. मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कातवड जोईवाडी येथील नळपाणी योजनेच्या कामातील पाईप लाईन काही ठिकाणी उघड्यावर असून त्यास धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी जमिनीतून बाहेर आलेली पाईपलाईन भूमिगत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आनंदव्हाळ कातवड गावातील जोईवाडी येथे नळपाणी योजनेचे काम करण्यात आले…

Read More

भाजप “पुढार्‍यांचा” परप्रांतीय व्यवसायांना छुपा पाठिंबा..?

आशिष सुभेदारांचा आरोप:तर मनसे खळखट्याक करेल.. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी येथे रोजंदारीवर येत ठेकेदार होऊन आता स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डंपर व्यवसायिकांच्या व्यवसायास फटका बसत असल्याबाबत सावंतवाडीतील स्थानिक व्यवसायिकांनी या विरोधात आवाज उठवत संबंधित परजिल्ह्यातील व्यवसायिकांना मज्जाव केला होता एकीकडे भाजप…

Read More

देशाला, समाजाला सावरायची मोठी जबाबदारी ज्येष्ठांवरच…

बाळकृष्ण मराठे:ज्येष्ठांनी कार्यरत झाल्यास समाज सुदृढ, कुटुंबव्यवस्थेला दिशा मिळेल… ⚡कणकवली ता.०२-:देशाला, समाजाला सावरायची मोठी जबाबदारी ज्येष्ठांवरच आहे. कारण, कार्यरत राहणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कुटुंब व्यवस्था कोलमडली, त्यामुळे समाज भरकटला, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ज्येष्ठांनी कंबर कसण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण मराठे यांनी तळेरे येथे…

Read More

सटमटवाडी बॉकसेलनजिक नवीन महामार्गला जोडणारा सेवा रस्ता तात्काळ सुरु करा…

जावेद खतीब:राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता यांची भेट घेत निवेदन केले सादर.. ⚡बांदा ता.०२-: बांदा – पत्रादेवी (जुना मुंबई-गोवा महामार्ग) रस्त्यावर सटमटवाडी बॉकसेलनजिक परंपरागत असलेला व नवीन महामार्गला जोडणारा सेवा रस्ता तात्काळ सुरु करावा यासाठी बांदा उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता एम आर साळुंखे व कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळी यांची…

Read More

आम. नितेश राणे मतदार संघात 12 स्क्रीनवरून दाखविणार नौसेना दिनाचे थेट प्रक्षेपण…

⚡कणकवली ता.०२-: 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे होणारा नौसेना दिन मतदार संघातील जनतेला पाहता यावा. त्या ठिकाणी होणाऱ्या नौदलाच्या कवायती जनतेला अनुभवता याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकता यावेत यासाठी आम. नितेश राणे हे मतदारसंघातील कणकवली, देवगड,वैभववाडी या तिन्ही तालुक्यात बारा ठिकाणी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण करणार आहेत. त्याबाबतची…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ व ४ रोजी…

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला पंचायत समिती व जिल्हा परिषद सिधुदुर्ग शिक्षण विभाग यांच्यावतीने ५१वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ व ४ डिसेंबर या कालावधीत वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी…

Read More

खर्डेकर कॉलेज ते सामंत घर डांबरीकरण कामाचा शुभारंभ…

मंत्री केसरकर यांनी २५ लाखाचा उपलब्ध केला निधी:जिल्हा संघटक सुनील डूबळे यांनी फोडला नारळ.. ⚡वेंगुर्ले ता.०२-: शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान निधीतून सुमारे २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केलेल्या वेंगुर्ले शहरातील बॅ. खर्डेकर कॉलेज ते दिलीप सामंत यांचे घरापर्यंत जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनिल डुबळे यांच्या हस्ते संपन्न…

Read More

बांदा येथे ५ डिसेंबर रोजी ज्ञानदीप व्याख्यानमालेचे आयोजन…

⚡बांदा ता.०२-: बांदा येथील गोगटे वाळके कॉलेज मार्फत जागतिक किर्तीचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि महाविद्यालयाचे व शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्ञानदीप व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प विख्यात मुक्त शोध पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार श्री. निळू दामले गुंफणार आहेत. ‘लोकशाहीचे काय होणार?’ या विषयावर त्यांचे…

Read More

विभागीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलचे उत्तुंग यश…

⚡सावंतवाडी ता.०२-: नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु . अमुल्य घाडी या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कु.राम फाले या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला.या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झालेली आहे. या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी…

Read More
You cannot copy content of this page