सटमटवाडी बॉकसेलनजिक नवीन महामार्गला जोडणारा सेवा रस्ता तात्काळ सुरु करा…

जावेद खतीब:राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता यांची भेट घेत निवेदन केले सादर..

⚡बांदा ता.०२-: बांदा – पत्रादेवी (जुना मुंबई-गोवा महामार्ग) रस्त्यावर सटमटवाडी बॉकसेलनजिक परंपरागत असलेला व नवीन महामार्गला जोडणारा सेवा रस्ता तात्काळ सुरु करावा यासाठी बांदा उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता एम आर साळुंखे व कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळी यांची भेट घेत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, बांदा-पत्रादेवी (जुना मुंबई-गोवा महामार्ग) रस्त्यावर सटमटवाडी बॉकसेलनजिक गेली अनेक वर्षे नवीन महामार्गला जोडणारा सेवा रस्ता कार्यरत होता. मात्र कालांतराने हा सेवा रस्ता बंद करण्यात आला. परिणामी गोवा राज्यातून बांदा शहरात येण्यासाठी पर्यायी मार्गच उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. या सेवा रस्त्याचा वापर अनेकजण करत होते. त्यामुळे स्थानिकांच्या मागणीनुसार तात्काळ हा सेवा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करावा.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून सेवा रस्ता मंजूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपसरपंच जावेद खतीब, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, अक्षय परब, मंदार कुडव, कौस्तुभ दळवी, कृष्णा परब, रजत शिरोडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page