खर्डेकर कॉलेज ते सामंत घर डांबरीकरण कामाचा शुभारंभ…

मंत्री केसरकर यांनी २५ लाखाचा उपलब्ध केला निधी:जिल्हा संघटक सुनील डूबळे यांनी फोडला नारळ..

⚡वेंगुर्ले ता.०२-: शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान निधीतून सुमारे २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केलेल्या वेंगुर्ले शहरातील बॅ. खर्डेकर कॉलेज ते दिलीप सामंत यांचे घरापर्यंत जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनिल डुबळे यांच्या हस्ते संपन्न झाला.


या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम यांनी, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील नागरीकांना पायाभुत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्याने निधी दिला जात आहे. वेंगुर्ले शहरातील कांही रस्त्याची कामे व डागडुजी करावयाची आहे, अशी कामे श्री. केसरकर यांना सांगितलेली असून लवकरच ती कामे पुर्ण करण्यात येतील अशी माहिती या प्रसंगी दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांत शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, युवक शहर अध्यक्ष संतोष परब, तसेच राजू परब, संजय परब, प्रभाकर पडते यसह स्थानिक नागरीक उपस्थित होते.

You cannot copy content of this page