Headlines

नाणोसमध्ये धोकादायक परिस्थितीची पंचायत समिती सदस्यांकडून पाहणी..

संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ उपाययोजना करण्याची केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.०७-: नाणोस गावातील निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची पंचायत समिती पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. पंचायत समिती उपसभापती श्री. गौरेश मुळीक, पंचायत समिती सदस्य श्री. जितू गावकर, अरोंदा मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या सौ. स्नेहा कांबळी तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. अजित पाटील व लोहार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीबाबत जाब विचारण्यात आला. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून काम हाती घेण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना दिल्या. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी नाणोसच्या सरपंच सौ. साक्षी शेटये, उपसरपंच सौ. अमिता नाणोसकर, सदस्य सौ. संजना नाणोसकर, सदस्य श्री. रवींद्र जोशी, सौ. रसिका जोशी, सौ. सानिया शेटये, श्री. विनायक शेटये, सोसायटीचे चेअरमन श्री. संतोष शेटये यांच्यासह नाणोस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page