उघड्यावरील पाईपलाईन भूमिगत करावी…

ग्रामस्थांची मागणी: पाणी पुरवठ्यात खंड पडण्याची व्यक्त केली भीती..

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कातवड जोईवाडी येथील नळपाणी योजनेच्या कामातील पाईप लाईन काही ठिकाणी उघड्यावर असून त्यास धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी जमिनीतून बाहेर आलेली पाईपलाईन भूमिगत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आनंदव्हाळ कातवड गावातील जोईवाडी येथे नळपाणी योजनेचे काम करण्यात आले आहे. यातील पाईप लाईन ही भूमिगत मार्गाने नेण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी हा पाईप जमिनीत व्यवस्थित न बसवता तो उघड्यावर आहे. त्यामुळे हा पाईप फुटून पाईप लाईन खराब होण्याची तसेच पाणी पुरवठ्यात खंड पडण्याची भीती आहे. त्यामुळे यां पाईप लाईनचे उघड्यावरील पाईप व्यवस्थित भूमिगत करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

You cannot copy content of this page