भाजप “पुढार्‍यांचा” परप्रांतीय व्यवसायांना छुपा पाठिंबा..?

आशिष सुभेदारांचा आरोप:तर मनसे खळखट्याक करेल..

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी येथे रोजंदारीवर येत ठेकेदार होऊन आता स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डंपर व्यवसायिकांच्या व्यवसायास फटका बसत असल्याबाबत सावंतवाडीतील स्थानिक व्यवसायिकांनी या विरोधात आवाज उठवत संबंधित परजिल्ह्यातील व्यवसायिकांना मज्जाव केला होता एकीकडे भाजप जिल्ह्यातील उत्तरभारतीयांची संघटना बांधत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील भाजपमधील ‘पुढारी’ परप्रांतीयांच्या व्यवसायांना छुपा पाठिंबा देत आहे.जर भाजप स्थानिक व्यावसायिकांच्या विरोधात पक्षीय राजकारण करत परप्रांतीयांना पाठिंबा देणार असेल तर मनसेची भूमिका स्थानिक व्यावसायिकांच्या बाजूने खळखट्याकची असेल असे परखड मत मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी मांडले आहे.

जनतेने सत्तेत असलेल्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा. राज ठाकरे यांनी सातत्याने परप्रांतीयबद्दलची मनसेची भूमिका मांडली आहे.माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उत्तरभारतीयांच्या संघटनेबद्दल बोलताना भविष्यात सिंधुदुर्गातील सरपंच परप्रांतीय असण्याची भीती व्यक्त केली होती.भाजपकडून परप्रांतीयांची संघटना स्थापन करून नेमके काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता.

आज सावंतवाडीत जे रोजंदारी कामावर आले होते ते आता ठेकेदार होऊन काहींनी जेसीबी डंपर मशीन घेतली. स्थानिक व्यवसायिकांपेक्षा कमी दर लावून आपल्या मशीनरी सावंतवाडीत भाड्याने देत आहेत.जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर आपल्या राज्यातून अल्पव्याजदराने कर्जावर आणत आहेत.हा प्रकार रोखण्याची ही आत्ताच वेळ आहे. अन्यथा हे लोक जमिनी घेतील घरे बांधतील आणि शेठ होतील.परराज्यातील गुन्हेगारी सुद्धा सावंतवाडीत येईल आणि वाढेल.स्थानिक व्यावसायिक मात्र उपरे होतील. वेळ निघून जाण्याअगोदर स्थानिकांनी अजून संघटित होऊन परप्रांतीय व्यवसायिकांना शहरातून हुसकावून लावणे आवश्यक आहे.त्यासाठी गरज पडल्यास मनसे खळखट्याक करेल.

सावंतवाडी शहरातील अनेक तरुण मोठ्या मेहनतीने कर्ज घेऊन,डंपर,ट्रॅक्टर,जेसीबी व्यवसाय करत आहेत आणि परप्रांतीयांच्या ह्या मजुरीमुळे आज आमचे स्थानिक अडचणीत येत आहेत तरी परप्रांतीय व्यवसायिकांनी आपापले जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर घेऊन आपले गाव गाठावे तसेच आमच्या स्थानिक व्यावसायिकांच्या संघटनेच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा असल्याचेही मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page