Headlines

भाजपा युवा मोर्चा मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूर येथील सुमित सावंत यांची निवड

मालवण दि प्रतिनिधी :

भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमोच्या मालवण- ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदिप चंद्रकांत मेस्त्री यांनी या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले आहे. सुमित सावंत यांच्या या निवडीमुळे मालवण-ग्रामीण भागात भाजप संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या बैठकीस भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस *संतोष पुजारे, जावेद खतीब, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश रावराणे, राकेश सावंत , मालवणचे नगरसेवक ललित हरी चव्हाण , देवेंद्र शेटकर (जिल्हा चिटणीस), कुडाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, प्रसाद कृष्णा पाटकर , , कुडाळचे युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर , मयूर राणे , विनेश तावडे , सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक , परेश कांबळी , सागर पवार , शुभम परब , कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी , देवगड भाजप अध्यक्ष अतुल सरवटे , कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे , कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी आणि बांदा पक्ष युवा अध्यक्ष सिद्धेश कांबळी, पराशर सावंत यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित सावंत यांच्या निवडीबद्दल भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page