Headlines

आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळचे उपसरपंच दिलीप गोवेकर यांचे निधन

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळचे उपसरपंच दिलीप जानू गोवेकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ गावात हळहळ व्यक्त होत असून राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page