⚡सावंतवाडी ता.०२-: नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु . अमुल्य घाडी या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कु.राम फाले या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला.या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झालेली आहे.
या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
