Headlines

केसरकारांनी एक तरी जनहिताचं काम दाखवावे; अन्यथा मी “टराटरा बुरखा” फाडणार…

राजन तेली: युतीचा धर्म मला शिकू नये; यापुढे मी असाच बोलणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: गेल्या पंधरा वर्षात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोल बच्चनगिरी करून जनतेला फसवण्याचे काम केले.त्यांनी जनहिताचे एक तरी काम दाखवावे अन्यथा मी गावा गावात जाऊन टराटरा बुरखा फाडणार असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिला. दरम्यान युती धर्माबाबत…

Read More

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश…

⚡सावंतवाडी ता२२-: तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले._या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका…

Read More

शालेय तालूकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचे यश …

⚡सावंतवाडी ता.२२-: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२४- २५ मध्ये तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी प्रशालेच्या कु. खुशी संतोष गवस हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे . कु. खुशी जिल्हास्तरासाठी आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट…

मिलाग्रीसच्या कु. विराज राऊळ कडून पेन्सिल पोर्ट्रेट स्केच.. ⚡सावंतवाडी ता.२२-: मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच देऊन त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. कु विराज राऊळ या विद्यार्थ्याने आपली काढलेली हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच पाहून मंत्री…

Read More

ओटवणेतही अळंबी खाल्याने तिघांना विषबाधा…

सावंतवाडी ता.२२-: कोलगांव पाठोपाठ ओटवणे येथे रविवारी रात्री अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. एकाच कुटुंबातील तिघांना याचा त्रास जाणवल्यानंतर त्यांना रात्रीच त्वरीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. आता दोघांची प्रकृती स्थिर आहे.

Read More

अल्पावधीत समाजोपयोगी उपक्रमातून घडलेले नेतृत्व म्हणजे “दिनेश गावडे”…

आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील युवकांच्या गळ्यातील ताईत:चौकुळ गावातील दिनेश गावडे यांच्यावर वाढदिवसा निमित्त होतोय शुभेच्छांचा वर्षाव.. सावंतवाडी ता.२२ प्रसन्न गोंदावळे -:युवा उद्योजक ते सामाजिक कार्यकर्ता अशी वाटचाल करत आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात अल्पावधीतच आपल्या नावाचे वलय निर्माण करून लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा नेतृत्व म्हणजे श्री दिनेश गावडे होय. दुर्गम अशा चौकुळ गावातून…

Read More

गुरुची शिकवण आपल्या आचार विचारांमध्ये कायम ठेवावी…

रघुनाथ शेवडे :टोपीवाला हायस्कुलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी.. ⚡मालवण ता.२१-: आषाढी पौर्णिमेला व्यास मुनींचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणतात. आपल्या जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे असून गुरुची शिकवण आपल्या आचार विचारांमध्ये कायम ठेवावी, गुरुच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची मार्गक्रमणा करावी, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक रघुनाथ शेवडे यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला…

Read More

विजयदुर्ग- कोल्हापूर महामार्गावर मांडूकली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प…

⚡वैभववाडी ता.२१-: गेले अनेक दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडण्याऱ्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग कोल्हापूर महामार्गावर गगनबावडा तालुक्यात मांडूकली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर विजयदुर्ग मार्ग टप्प झाला आहे ही वाहतूक फोंडा राधानगरी मार्गे वळवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात गेली अनेक दिवस सतत पडणाऱ्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून विजयदुर्ग तरळे वैभववाडी गगनबावडा ते…

Read More

सटमटवाडी येथे मंजूर असलेला बोगदा व सेवा रस्त्याचे काम न बदलता मुळ आराखड्याप्रमाणेच करावे…

सटमटवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंतांकडे निवेदनद्वारे केली मागणी.. ⚡बांदा ता.२१-: बांदा सटमटवाडी येथे महामार्गावर मंजूर असलेला बोगदा व सेवा रस्त्याचे काम हे आराखड्यात बदल न करता मुळ आराखड्याप्रमाणेच करावे अशा मागणीचे निवेदन सटमटवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिकांना अंधारात ठेवत मुळ आराखड्यात बदल करण्यासाठी महामार्ग विभागाला…

Read More

मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली येथे इर्टिगा कारला अपघात…

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथे कृष्णा नगरी नजीकच्या वळणावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी इर्टिगा कार पलटी झाली. हा अपघात रविवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास झाला. मात्र अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. परंतु अपघातात करच्या दर्शनी व मागील भागाचे मोठे नुकसान झाले होते. तर कार साधारणपणे रस्ता सोडून १५ ते २० फूट फरफटत…

Read More
You cannot copy content of this page