Headlines

आषाढी नामदिंडीत लायन्स क्लब मालवणकडून भाविकांची सेवाभावाने अल्पोपाहार व पाणी वाटप…

⚡मालवण ता.२५-:
आषाढी एकादशीच्या पवित्र योगावर मालवण तालुक्यातील वायरी येथील प. पु. सदगुरु नामदेव महाराज मठाच्या वतीने आयोजित नामस्मरण पायी दिंडीत सेवा बजावत लायन्स क्लब मालवणच्या वतीने भाविकांना अल्पोपाहार व पाणी वाटप करण्यात आले.

यावेळी काही वेळ नामदिंडी सोबत पायी चालत मालवण लायन्स क्लब सदस्यांनी भक्तिमय सोहळ्यात आषाढी वारीची सेवा बजावली. या सेवाकार्यास मालवण लायन्स क्लब खजिनदार राधिका मोंडकर, जेष्ठ सदस्य जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, विनोद शंकरदास यांसह भाविक उपस्थित होते.

You cannot copy content of this page