Headlines

‘शिवाजी महाराजांची जडणघडण’ विषयावरील व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रेरणा…

⚡मालवण ता.२५-:
आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चांगले गुण आत्मसात करताना जीवनात त्यांचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक तथा भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष रविराज पराडकर यांनी येथे बोलताना केले

वायरी भूतनाथ येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांचे “शिवाजी महाराजांची जडणघडण” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर भारतीय इतिहास संकलन समिती, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सचिव डॉ. कमलेश चव्हाण, कोकण प्रांताचे माध्यम प्रचार विभाग प्रमुख तुणीर कांबळी, शिवप्रेमी संघटना कुडाळचे विवेक पंडित, शिवम महाडेश्वर, जय डोंगरे, रेकोबा हायस्कुलचे शिक्षक श्रीनाथ फणसेकर, विक्रांत सौरभ संभाजी कोरे भूषण साटम आदी उपस्थित होते प्रारंभी नंदकुमार डगरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

यावेळी पराडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर शिवचरित्रातील अनेक पैलू उलगडून सांगितले.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडविण्यामागे शहाजीराजांचे दूरदृष्टीचे नियोजन, राजमाता जिजाऊंचे संस्कार, त्यांचे धाडस, आत्मविश्वास आणि स्वराज्याचे स्वप्न यांचा कसा मोलाचा वाटा होता, हे स्पष्ट करताना बाल वयातच शिवाजी महाराजांनी विविध विषयांचा अभ्यास करून न्यायनिवाडा, संघटन कौशल्य, माणसे जोडण्याची कला आणि स्वराज्य स्थापनेचा दृढ संकल्प कसा केला, तसेच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले, याची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी प्रवीण कुबल, रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर, शेर्लेकर व टेंबुलकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. शेवटी संभाजी कोरे यानी आभार मानले

You cannot copy content of this page