Headlines

भंडारी प्राथमिक शाळेच्या मुलांनी काढली वारकरी दिंडी…

⚡मालवण ता.२५-:
जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल असा विठुरायाचा जयघोष करत आणि विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषा करीत मालवण मधील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यानी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी काढली. लहान मुलांनी काढलेली ही दिंडी सर्वांचे आकर्षण ठरली.

भंडारी प्राथमिक शाळेत काढलेल्या वारकरी दिंडी मध्ये विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा करत, कपाळावर टिळा लावत, डोईवर तुलसी वृंदावन घेऊन, भगव्या पताका फडकवत आणि टाळ चिपळीच्या संगे विठू नामाचा गजर करत लहान मुले सहभागी झाली होती. मुलांनी साकारलेल्या या वेशभूषा सर्वांचेच आकर्षण ठरल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी ही वारकरी दिंडी काढली.

यावेळी भंडारी ए. सो. हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे,
भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षिका सौ. राधा दिघे, स्वाती दळवी, मानसी परुळेकर, सौ. तृप्ती वालावलकर, सौ. योगिता तारी , हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page