आनंदव्हाळ येथे भरधाव मोटरसायकलची एसटी बसला धडक…

⚡मालवण ता.१६-: मालवण- कसाल हमरस्त्यावरील आनंदव्हाळ येथे काल बुधवारी रात्री भरधाव मोटारसायकलने एसटी बसला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मालवण कसाल मार्गावर आनंदव्हाळ भगवती हॉटेल नजीक वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी मालवण (एमएच…

Read More

देवगड किल्ला भागात नळाला गढूळ व दूषित पाणी…

भाजपच्या नगरसेवकांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष:तात्काळ उपाययोजना करण्याचे मुख्याधिकारी यांचे आश्वासन.. ⚡देवगड ता.१६-:देवगड प्रादेशिक नळयोजनेचे देवगड किल्ला भागामध्ये नागरिकांना गढूळ व दूषित पाणी येत आहे. या पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .नगरपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा,अशी मागणी करत भाजपा नगरसेवकांनी मुख्याधिकारी सूरज कांबळे यांचे लक्ष वेधले. भाजपचे न….

Read More

डेगवे बाजारवाडी येथील बीएसएनएलचा मोबाईल मानोरा गेले पंधरा दिवस बंद…

वेळोवेळी तक्रार करूनही कंपनीकडून कोणतीही दखल नाही:पंचक्रोशीतील सरपंच व सर्व ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन करणार;प्रवीण देसाई.. ⚡बांदा ता.१६-: डेगवे बाजारवाडी येथे असलेला बीएसएनएलचा मोबाईल मानोरा गेले पंधरा दिवस बंद असल्याने येथील मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कंपनीकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने डेगवे पंचक्रोशीतील सर्व सरपंच व ग्रामस्थ यांना घेऊन तीव्र…

Read More

एस टी आगाराचे काम निकृष्ट दर्जाचे…

भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कामाची पाहणी.. ⚡वेंगुर्ले ता.१६-: येथील आगाराचे सध्यस्थितीतील सुरू असलेले नूतनीकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीचे आणी निकृष्ट दर्जाचे असून चुकीचे अंदाजपत्रक असल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी या कामाची पाहणी करत…

Read More

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व जलक्रीडांना १० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी…

आम. वैभव नाईक; मेरिटाईम बोर्डाकडे केलि मागणी.. मालवण : (प्रतिनिधी) ऐन पर्यटन हंगामात गेले महिनाभर लोकसभा निवडणूकीची धामधूम, त्यामुळे पर्यटकांची कमी झालेली संख्या आणि आता संपत आलेला पर्यटन हंगाम यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिक आधीच चिंताग्रस्त असताना मेरीटाइम बोर्डाने नियमावर बोट ठेवत पावसाळी हंगामासाठी २५ मे पासून जालक्रीडा व सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याच्या दिलेल्या…

Read More

‘तिमिरातुनि तेजाकडे’ संगीत अल्बममधील गीतकार व बागायतचे सुपुत्र विजय जोशी यांचा गौरव…

⚡मालवण ता.१६-: स्वरकुल ट्रस्ट आणि त्यागराज म्युझिक अकॅडमी निर्मित ‘तिमिरातुनि तेजाकडे’ ह्या भारतातील पहिल्या अंध दिव्यांग गायकांची दहा गाणी समाविष्ट असलेल्या संगीत अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे नुकतेच संपन्न झाले.या अल्बम मध्ये मसुरे (खेरवंद वाडीचे) सुपुत्र कवी गझलकार समीक्षक साहित्यिक व गीतकार विजय जोशी (विजो) यांच्या…

Read More

मालवणी बझारच्या ग्राहक भेट योजना सोडतीचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.१६-:मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण तर्फे ग्राहक सभासदांसाठी मालखरेदीवर ग्राहक भेट योजना जाहीर करणेत आलेली. जाहिर करण्यात आलेल्या भव्य ग्राहक भेट योजना सोडतीचा निकाल जाहीर झाला आहे. संस्थेच्या मालवण कट्टा व आचरा या शाखांमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी भाग्यवंत विजेत्या ग्राहकांना भेटवस्तू देऊन…

Read More

शेतकरी अाक्रमक, सावडाव धरणाचे काम पाडले बंद…

⚡कणकवली ता.१६-: फोंडाघाट मृद व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडून सावडाव धरणाचे काम सुरु आहे . सदर काम शेतक-यांना जमीन भुसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत काम सुरु केले. धरणग्रस्त शेतक-यांनी गुरुवारी थेट धरण परिसरात जावून ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडले. वडीलोपार्जित असलेल्या आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर दांडगाईने ठेकेदाराने काम सुरु केले आहे….

Read More

पन्नास फुट टाकीवर चढत विलास जाधव यांचे अनियमित पाणीपुरवठय़ावर वेधले लक्ष…

समाज मंदिर परिसरातील घटना: जोपर्यंत टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही; पालिका प्रशासनाला दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१६-: शहरातील समाजमंदिर परिसरात वारंवार अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट सुमारे पन्नास फूट उंचीच्या टाकीवर चढत निषेध व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधून देखील नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचं त्यांचे म्हणणे आहे….

Read More

आंबोली घाटात आयशर ट्रक व टेम्पोमध्ये अपघात…

कोणालाही दुखापत नाही; ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡आंबोली ता.१६-: येथील घाटातील धोकादायक वळणावर आयशर ट्रक व टेम्पो यांच्यात अपघात झाल आहे. सुदेवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी आयशर ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी आंबोली दूरक्षेत्रावरील पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन वाहतूक सुरळीत केली.

Read More
You cannot copy content of this page