कट्टा येथील भाबल कुटुंबाला पोचली आमदार नितेश राणे यांची मदत…

⚡देवगड ता.२२-: देवगड तालुक्यातील कट्टा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी जामसंडे कट्टा येथील यामुळे मंगेश भाबल यांच्या राहत्या घरावर आंबा कलम झाड कोसळून घराचे फार मोठे नुकसान झाले होते .यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.आमदार नितेश राणे यांनी या झालेल्या नुकसानीची प्रशासकीय यंत्रणेला पाहणी करून जास्तीत जास्त सरकारी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश दिले होते.त्यानुसार देवगड तहसिलदार साकेत यमगर तसेच स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि तसा अहवाल पाठवला आहे.


आमदार राणे यांच्या सूचनेनुसार भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी ही या नुकसानीची पाहणी करत वस्तुस्थितीची माहिती दिली.
आमदार राणे यांनी तात्काळ स्वखर्चाने सदर घराला लागणारे सर्व सिमेंट पत्रे तात्काळ पाठवण्याची व्यवस्था केली त्यामुळे भाबल कुटुंबियांना मोठा आधार मिळाला.
या पहाणी दरम्यान जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश लोके ,माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर ,कट्टा ग्रामपंचायत सरपंच सौ.श्वेता कोयंडे ,ग्राम. प. कर्मचारी संतोष करंगुटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page