पोलिसात भरती करण्याचे आमिष दाखवून १६ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक…

कोल्हापूर येथील एकावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

ओरोस ता २२-:पोलीस अधिकारी असल्याचे बनाव करून पोलीस भरतीमध्ये भरती करतो सांगून १६ लाख ४७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे येथे कोल्हापूर संदीप बळवंत गुरव वय 39 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 10 जानेवारी 2023 ते 15 डिसेंबर 2023 या मुदतीत आंबोली, ओरस, कोल्हापूर या ठिकाणी घडला आहे. याबाबत 22 जुलै 2024 रोजी सायंकाळी 17.34 वाजता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बळवंत गुरव वय 39 वर्ष राह.संस्कार बंगला शांती उद्यान आपटे नगर जिल्हा कोल्हापूर याने आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून फिर्यादी यांना त्यांच्या मुलास अगोदर पोलिस शिपाई भरतीमध्ये लावून देतो असे सांगून, त्यानंतर राज्य गुप्तवार्ता विभागात नोकरीस लावतो असे सांगून 10 जानेवारी 2023 रोजी 3 लाख रुपये, 14 जानेवारी 2023 रोजी 3 लाख 25 हजार रुपये, 23 जानेवारी 2023 रोजी 25 हजार रुपये, 7 फेब्रुवारी 2023 रोजी 3 लाख 75 हजार रुपये, आणि 6 हजार रुपये, 27 मार्च 2023 रोजी 1 लाख रुपये, 30 मार्च 2023 रोजी 2 लाख रुपये, 9 जून 2023 रोजी 3 लाख रुपये, 3 सप्टेंबर 2023 रोजी 10 हजार रुपये, 6 ऑक्टोबर 2023 रोजी 3 हजार रुपये, 15 डिसेंबर 2023 रोजी 3 हजार रुपये याप्रमाणे एकूण 16 लाख 47 हजार रुपयांची वेळोवेळी वेगवेगळी कारणे देऊन वरील प्रमाणे रक्कम घेऊन नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून फिर्यादीची फसवणूक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम हे करीत आहेत. फिर्यादीचे नाव उघड होवू नये म्हणून पोलिसांकडून नाव देण्यात आलेले नाही.

चौकट
जर असा प्रकार कोणासोबत घडला असल्यास किंवा तसे आपल्या निदर्शनात येत असेल तर तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page