अतिवृष्टीमुळे मुणगे येथील शुभांगी मुणगेकर यांचे घर कोसळून सुमारे २ लाख ९० हजारांचे नुकसान…

⚡देवगड ता.२२-: देवगड तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात मुणगे येथील शुभांगी बबन मुणगेकर यांचे घर अतिवृष्टीमुळे पूर्णतः कोसळून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र सदर घरात कोणीही राहत नसल्याने अनर्थ टळला.
तालुक्यात ५१ मिमी इतका पाऊस झाला. पाऊस आला की बळीराजा सुखावतो मात्र आता सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजा देखील भात पिकाचे नुकसान होत असल्यामुळे दुखावलेला पहायला मिळतोय.

You cannot copy content of this page