⚡वैभववाडी ता.२१-: गेले अनेक दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडण्याऱ्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग कोल्हापूर महामार्गावर गगनबावडा तालुक्यात मांडूकली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर विजयदुर्ग मार्ग टप्प झाला आहे ही वाहतूक फोंडा राधानगरी मार्गे वळवण्यात आली आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात गेली अनेक दिवस सतत पडणाऱ्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून विजयदुर्ग तरळे वैभववाडी गगनबावडा ते कोल्हापूर अशा राज्य मार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडूकली नदीचे पाणी मांडूकली गावाजवळ रस्त्यावर आल्याने विजयदुर्ग कोल्हापूर वैभववाडी मार्ग टप्प झाला आहे ही वाहतूक राधानगरी फोंडा घाटांनी वळवण्यात आले आहे.
वैभववाडी तालुक्यातून जाणारे दोन भुईबावडा व करूळ घाट असून गेली सहा महिने नूतनीकरणाच्या कामासाठी करू घाट बंद असला तरी भुईबावडा घाट आणि वाहतूक चालू होती अखेर रविवारी सायंकाळी गगनबावडा तालुक्यात मांडूकली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग पूर्णपणे टप्प झाला आहे व पंचगंगेचे पाणी सुद्धा रस्त्यावर आले आहे जर पावसाचा जोर वाढला तर गगनबावडा तालुक्यातील विजयदुर्ग कोल्हापूर राज्य मार्गावर असणाऱ्या खोर्कुर्ली फाटे गावाजवळील रस्त्यावर सुद्धा पाणी भरण्याची शक्यता आहे.
