शालेय तालूकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचे यश …

⚡सावंतवाडी ता.२२-: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२४- २५ मध्ये तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी प्रशालेच्या कु. खुशी संतोष गवस हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे . कु. खुशी जिल्हास्तरासाठी आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले .

सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे  पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ  

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी कु . खुशी गवस हिचे अभिनंदन केले व पुढील जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page