केसरकारांनी एक तरी जनहिताचं काम दाखवावे; अन्यथा मी “टराटरा बुरखा” फाडणार…

राजन तेली: युतीचा धर्म मला शिकू नये; यापुढे मी असाच बोलणार..

सावंतवाडी ता.२२-: गेल्या पंधरा वर्षात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोल बच्चनगिरी करून जनतेला फसवण्याचे काम केले.त्यांनी जनहिताचे एक तरी काम दाखवावे अन्यथा मी गावा गावात जाऊन टराटरा बुरखा फाडणार असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिला.

दरम्यान युती धर्माबाबत केसरकर यांनी मला शिकू नये ,मला जो काय आदेश द्यायचे आहे ते मला वरिष्ठ देतील,परंतु तुमच्या विरोधात यादी बोलायचं कोण धाडस करत नव्हते ते आता मी करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला श्री तेली आज आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री. तेली पुढे म्हणाले की पंधरा वर्षात आठ वर्ष मंत्रीपद आणि सात वर्ष आमदार या कालावधीत एक तरी असे काम राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे का. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ते फक्त चाकरमनी सारखेच वावरत आहेत. त्यामुळे त्यांचा आता पराभव जनतेने करण्याचे ठरवले आहे. त्यांचे बोलबच्चन आणि निवडणुका आल्या की दोन महिन्यांपूर्वी पंचतारांकित हॉटेल्स आणि पर्यटन प्रकल्प दिसतात. त्यांच्या बोलबच्चन चा पाढा गावागावात फिरून आपण वाचणार आहे आणि त्यांचा खरा चेहरा मतदारसंघासमोर आणणार आहे असे भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली स्पष्ट केले.दरम्यान महायुती असले तरी श्री केसरकर हे काही आमचे नेते नाहीत आमचे नेते भाजपचे आहेत त्यामुळे जनतेच्या हितासाठी केसरकर यांच्या विरोधात मी लढणारच आहे. मला तिकीट मिळो न मिळो . पंधरा वर्षे जनतेची फसवणूक करणाऱ्या केसरकर यांच्या विरोधात मी आवाज उठवणारच आहे असे तेली म्हणाले

You cannot copy content of this page