गद्दारांचा पराभव करण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा…

रुपेश राऊळ: केसरकरांचा पराभव करण्यासाठी अर्चना घारेंकडे संघटनात्मक ताकद नाही

⚡सावंतवाडी ता.२२-: गद्दारांचा पराभव करण्यासाठी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी आम्ही आज एकमुखी ठराव घेतला असून तो आम्ही जिल्हाप्रमुखां मार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहे अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज इथे दिली.दरम्यान मंत्री केसरकर यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंची जी संघटना गावात आहे ती संघटनात्मक ताकद अर्चना घारींकडे नाहीत असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री राऊळ पुढे म्हणाले महाविकास आघाडीचा फॉर्मुला निवडून येणाऱ्या उमेदवाराला संधी द्यावी असं देखील ठरल आहे. त्यामुळे आजच्या घडीला या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकतो असे वातावरण आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावे अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे असल्याचे देखील श्री राऊळ म्हणाले. दरम्यान या मतदारसंघातून शिवसेनेकडून पाच जण इच्छुक आहेत त्यांची नावं देखील आम्ही वरिष्ठांकडे पाठवली आहे परंतु कोणाला उमेदवारी मिळणार हे पक्षप्रमुखच ठरवते परंतु आमचं ध्येय एकच आहे या मतदारसंघात कोणत्या परिस्थितीत भगवा फडकला पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page