अल्पावधीत समाजोपयोगी उपक्रमातून घडलेले नेतृत्व म्हणजे “दिनेश गावडे”…

आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील युवकांच्या गळ्यातील ताईत:चौकुळ गावातील दिनेश गावडे यांच्यावर वाढदिवसा निमित्त होतोय शुभेच्छांचा वर्षाव..

सावंतवाडी ता.२२ प्रसन्न गोंदावळे -:युवा उद्योजक ते सामाजिक कार्यकर्ता अशी वाटचाल करत आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात अल्पावधीतच आपल्या नावाचे वलय निर्माण करून लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा नेतृत्व म्हणजे श्री दिनेश गावडे होय. दुर्गम अशा चौकुळ गावातून आपल्या सामाजिक कार्याची सुरवात करत त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना “ग्लोबल महाराष्ट्र” कडून घेतलेल्या त्यांच्या कार्याचा आढावा..
कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जन्म घेतलेल्या दिनेश गावडे या युवा तडफदार तरुणाने आपल्या गावातील लोकांसाठी आपल्या माणसांसाठी सावंतवाडी तालुक्यातील दुर्गम अशा चौकूळ यामुळे सामाजिक कार्यातून लोकांची सेवा सुरू केली आहे. म्हणतात ना घार उडे आकाशी चित्त तिचे पिल्लापासी प्रमाणे जरी कोल्हापूर सारख्या शहरात श्री गावडे लहानाचे मोठे झाले तरी आपल्या गावाकडची ओढ त्यांना कधीही थांबू शकले नाही. गावातील लोकांसाठी तसेच आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील जनतेसाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आणि परोपकारी असे असतात. कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात श्री गावडे यांचा जन्म झाला पूर्ण कुटुंबच कोल्हापूरमध्ये स्थायिक असल्याने उच्च शिक्षणही त्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या सामाजिक कार्यात सहभाग घेत असताना कोल्हापूर दक्षिण मधून गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला कोल्हापूर परिसरात जनतेचे प्रश्न सोडवत असताना आपल्या गावातील लोकांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे साठी त्यांनी अलीकडेच चौकूळ मधून सामाजिक कार्याला सुरुवात केले त्यांचा स्वभाव लोकांशी असलेले आपुलकीचे वागणे तसेच अडीअडचणीला धावून जाण्याबरोबरच सढळ असते त्यांच्या हातून होणारी मदत हे त्यांचे गुण आपसूकच लोकांना भावून गेले हळूहळू दिनेश गावडे हे व्यक्तिमत्व आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले.
श्री गावडे यांनी अलीकडच्या काळात युवकांसाठी काम करताना त्यांच्या आवडी जपताना क्रिकेट सारख्या खेळांसाठी प्रोत्साहन दिले महिलांना हळदीकुंकू तसेच अन्य कार्यक्रम आहे राबवले गणपती सणांमध्ये घरोघरी भेटवस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या जनतेप्रती त्यांची असलेली तळमळ सर्व कार्यातून ठळकपणे उमटत गेले. उद्या त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांनी गरीब दोन विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता दत्तक घेण्याचा मानस सोडला आहे भविष्यात त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी ते पार पडणार आहे याशिवाय शेतकऱ्यांसाठी त्यांनी खत वाटपही केले आहे विद्यार्थ्यांसाठी लवकरच वह्या वाटपाचा कार्यक्रमही ते हाती घेणार आहे.
देवसू येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांचे हे कार्य सुरू आहे राघोजी सावंत यांचे कृपाछत्र त्यांच्या पाठीशी असल्याने राजकारणातील त्यांची वाटचाल निश्चितच यशाकडे आहे यात दुमत नाही. “ग्लोबल महाराष्ट्र” कडूनही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

You cannot copy content of this page