अष्टविनायक कला क्रीडा मंडळ मळगावच्यावतीने शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संगणक पुस्तिकेचे वाटप…
⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: मळगाव येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने एक आगलावेगळा उपक्रम राबविण्यात आला असून शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्यावतीने “विकास संगणाकाचा परिचय” पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या अगोदरही या मंडळाकडून क्रीडा साहित्य, शालेय साहित्य या शाळेतील मुलांना वाटप करण्यात आले आहे. मुलांना पाहिली पासूनच संगणकाबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने…
