कुडाळ येथील युवक ठार: कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू..
⚡आंबोली,ता.२० अनिल चव्हाण-: येथील मुख्य रस्त्यावर गेळा- फाटा येथे इर्टिका गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कुडाळ येथील एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून बांबोळी येथे नेण्यात आले.
आंबोली येथे पर्यटनासाठी आज पर्यटक आले होते.त्यात कुडाळ सांगुर्डेवाडी येथील सिद्धेश सुहास गोसावी (वय २७) आणि अक्षय प्रकाश म्हाडगुत,(वय २७) रा.कुडाळ हे दुचाकीने कावळेसाद येथून पर्यटन करून फाट्यावरून मुख्य रस्त्यावर बाहेर पडून आंबोली च्या दिशेने जात असताना सांगली येथील पर्यटकांच्या इर्टिका कार ला धडक बसून सिद्धेश गोसावी जागीच ठार झाला तर अक्षय म्हाडगुत हा गंभीर जखमी झाला.त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ऍम्ब्युलन्स ने बांबोळी येथे नेण्यात आले.घटनास्थळी पोलीस हवालदार दत्ता देसाई आणि सहकाऱ्यांनी पाहणी करून कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
