विद्या विहार इंग्लिश स्कूलचायशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

⚡बांदा ता.२०-: लोककल्याण शिक्षण संस्था संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव प्रशालेतील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्याच्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, देवी सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दहावीतील जान्हवी मुळीक, तेजल गावडे, अदिती राज्याध्यक्ष, शिरोडा केंद्रात बारावी परीक्षेत प्रथम आलेली सानिका मोरजकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या व शिक्षक पालक संघाच्या सयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वच गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर यांनी समाजात लोप पावत चाललेली माणुसकी जपण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव, गावाच नाव मोठ केल पाहिजे आणि शिक्षणाबरोबरच चांगल माणूस बनणे तेवढच महत्वाच असल्याचे सांगितले. धाकोरे सरपंच सौ. स्नेहा मुळीक यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन केले.
शैक्षणिक साहित्यासाठी, ग्रामपंचायत आजगाव, देवयानी गाड, बाळकृष्ण हळदणकर, गोविंद भगत, बाबाजी गोवेकर, राम साटेलकर, प्रशालेचे सहकार्य लाभेल.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ. यशश्री सौदागर, धोकोरे सरपंच सौ. स्नेहा मुळीक, मुख्याध्यापक उत्तम भागीत, प्रा. कांबळे, श्री तुंगार, ट्रेनिंग कॉलेजचे शिक्षक वर्ग, वर्षा रेवाडकर, समृद्धी परब, सेजल रेडकर, अनंत पांढरे, उत्तम सातोसकर, जितेंद्र मोरजकर, राम साटेलकर, जोत्स्ना कळसुलकर, दिव्या काळोजी, प्रशालेचे शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मानसी परुळेकर, प्रास्ताविक उत्तम भागित यांनी केले. आभार काव्या साळवी यांनी मानले.
फोटो :-
आजगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.

You cannot copy content of this page