Headlines

अष्टविनायक कला क्रीडा मंडळ मळगावच्यावतीने शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संगणक पुस्तिकेचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: मळगाव येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने एक आगलावेगळा उपक्रम राबविण्यात आला असून शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्यावतीने “विकास संगणाकाचा परिचय” पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

या अगोदरही या मंडळाकडून क्रीडा साहित्य, शालेय साहित्य या शाळेतील मुलांना वाटप करण्यात आले आहे. मुलांना पाहिली पासूनच संगणकाबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने मंडळाने या पुस्तिकेचे वाटप केले आहे. या वाटपावेळी मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर, संदेश सोनुर्लेकर, निलेश नाटेकर, ज्ञानेश्वर राणे, सिद्धेश फेंद्रे, संदीप तेंडोलकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, श्रावणी सावंत, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर आदी उपस्थित होते. या वाटपाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी मंडळाचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page