स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी जय भोसले…

⚡सावंतवाडी ता.२१-: स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र संघटनेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी जय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर,प्रदेशाध्यक्ष किरण बागुल,कोकण प्रदेश अध्यक्ष प्रा.रुपेश पाटील यांनी जय भोसले यांची सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी निवड जाहीर केली.आज निवडीचे नियुक्ती पत्रक त्यांना प्रदान करण्यात आले.


जय भोसले यांची सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री ना.दीपक केसरकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,शिवसेना विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई,रामदास मेस्त्री,सूरज परब,रामचंद्र आंगणे आदी उपस्थित होते.जय भोसले या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page