पहिल्या निवडणुकीत पेटी आणि टाळांची गॅरंटी जशी संपली तशी केसरकरांच्या आमदारकीची गॅरंटी संपली…

परशुराम उपरकर: त्या व्हॅकेंज कंपनीचं काय; विशाल परबांना सवाल..

⚡सावंतवाडी ता.२१-: निवडणुकीच्या तोंडावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा पेटी टाळ मृदुंग वाटपाचे आमिष दाखविले आहे परंतु पहिल्या निवडणुकीत वाटप केलेल्या त्यांच्या पेटी आणि टाळांची गॅरंटी जशी संपली तशी गॅरंटी आता केसरकरांच्या आमदारकीची ही संपली आहे. पंधरा वर्षात त्यांनी जनतेला फसवले आता जनतेने त्यांना फसवून घरी बसवावे अशी टिका माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी केली.

तर कॅबिनेट मंत्री असूनही केसरकर
केसरकर स्वतःच्या शिक्षण खात्याला न्याय देऊ शकत नाही एखादा निर्णय घेताना त्यांना सचिवाकडे बोट दाखवावे लागते हे त्यांच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे असेही उपरकर म्हणाले.

श्री उपरकर यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत यावेळी आशिष सुभेदार,सुरेंद्र कोठवले, प्रवीण गवस आदी उपस्थित होते.

श्री उपरकर म्हणाले केसरकर यांनी नुकतीच विद्यार्थ्यांना जर्मनींना नोकरी देणार असे सांगून निवडणुकीच्या तोंडावर नवीन फतवा काढला आहे. मात्र केवळ घोषणा करायच्या आणि जनतेला फसवायचे असाच त्यांचा हा प्रयत्न आहे कारण याआधी निवडणुकीमध्ये केसकर यांनी चष्मा कारखाना आणून येथील युवकांना नोकऱ्या देणार असल्याचे आम्हीच दाखवले होते त्या नोकऱ्यांची पत्रे आधी त्यांनी द्यावी त्यानंतर सेटअप बॉक्स, जिल्ह्याच्या सीमेवर पर्यटन सुविधा केंद्राचा फोडलेला भूमिपूजनाचा नारळ, ड्रामा केअर सेंटर ॲमेझमेंट पार्क,नवाबाग येथील फिशर मेन व्हिलेज, आधी निरनिराळ्या घोषणांचे काय झाले याचे उत्तर द्यावे केवळ या ठिकाणी मायनिंग कंपनी आणून मायनिंगच्या मालकांकडून स्वतःसाठी रोजगार मिळवून घेण्याचे काम त्यांनी केले आहे आता पुन्हा एकदा पहिल्या निवडणुकीप्रमाणे टाळ मृदुंग पेटी वाटपाचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे परंतु पहिल्या पेटी टाळांची मुदत ज्याप्रमाणे संपली त्याप्रमाणे केसरकर यांच्या आमदारकीची ही मुदत संपली आहे त्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी जनतेला पंधरा वर्षात फसवले त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत जनतेने त्यांना पासून नवीन आमदार निवडून द्यावा.

श्री उपरकर पुढे म्हणाले, शालेय शिक्षण मंत्री म्हणून केसरकर स्वतःच्या खात्याला न्याय देऊ शकत नाही कारण एखादी योजना राबवताना सुद्धा त्यांना सचिवांकडे बोट दाखवावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव नाही त्यांच्यातील अकार्यक्षमता या मधून दिसून येते कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी सचिवान मार्फत योजना राबवून घ्यायची असते परंतु केसरकरांच्या बाबतीत हे उलटेच आहे. त्यामुळे जनतेने त्यांच्याकडून नेमकी कोणती अपेक्षा करावी हाच प्रश्न आहे आज रोजगाराच्या नावावर त्यांनी विविध घोषणा केल्या परंतु एकही रोजगार ते या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही त्यामुळे जनतेने येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांना अद्दल घडवावी.

त्या व्हॅकेंज कंपनीचे काय?

निवडणूक जवळ आली तसे अनेक जण सामाजिक कार्यातून आपण कोणतरी मोठा नेता असल्याचे दाखवून देत आहेत ज्याप्रमाणे केसरकरांनी 15 वर्ष जनतेला फसवले असाच हा एक प्रकार असून विशाल परब यांनी याआधी केलेल्या घोषणांचे आत्मपरीक्षण करावे व्हॅकेंज कंपनीच्या नावाखाली त्यांनी कुक्कुटपालनाच्या रोजगाराचे नेमके काय झाले चे उत्तर द्यावे. त्यामुळे जनतेने वेळीच सावध व्हावे असेही उपरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page