मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली येथे इर्टिगा कारला अपघात…

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथे कृष्णा नगरी नजीकच्या वळणावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी इर्टिगा कार पलटी झाली. हा अपघात रविवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास झाला. मात्र अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. परंतु अपघातात करच्या दर्शनी व मागील भागाचे मोठे नुकसान झाले होते. तर कार साधारणपणे रस्ता सोडून १५ ते २० फूट फरफटत येऊन डाव्या बाजूने पलटी झाली होती.

You cannot copy content of this page