कोलगावमध्ये अळंबीतून विषबाधा झाल्याने नऊ जण अत्त्यवस्थ…

सावंतवाडी : प्रतिनिधी

कोलगाव - कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने ९ जण अत्यवस्थ झाले आहेत. जेवणातील अळंबी खाल्ल्याने त्यांना उलटी  सुरू झाल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दिव्या कुंभार, दीपक कुंभार, गुणवंती कुंभार, दुर्वा कुंभार, निखिल कुंभार, नामदेव कुंभार, राजन कुंभार (सर्व रा. कोलगाव) तसेच सोनाली चंद्रकांत कुंभार व चंद्रलेखा चंद्रकांत कुंभार (दोघेही रा. मळेवाड) अशी त्यांची नावे आहेत. पैकी दीपक कुंभार, दुर्वा कुंभार, राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित सहा जणांवर सावंतवाडीत उपचार सुरू आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, कोलगाव कुंभारवाडी येथील कुंभार कुटुंबीयांनी आज दुपारी अळंबीजेवण बनविले होते. त्यांच्याकडे मळेवाड येथील नातेवाईक सोनाली कुंभार व चंद्रलेखा कुंभार या आल्या होत्या. सर्वांनी दुपारी एकत्रित जेवण केल्यानंतर सर्वांना लगेच उलटी व जुलाब यांचा त्रास सुरू झाला. स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी सर्व अत्यवस्थ ९ ही जणाना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. पैकी दीपक कुंभार, दुर्वा कुंभार व राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
You cannot copy content of this page